वक्तृत्व स्पर्धेचे नियम व अटी – Voice of Devendra 2025
पात्रता (Eligibility)
ही स्पर्धा महाराष्ट्रातील १४ ते २५ वयोगटातील सर्व युवक-युवतींसाठी खुली आहे.
स्पर्धक मराठी, हिंदी, किंवा इंग्रजी या भाषांमध्ये सहभाग घेऊ शकतात.
प्रथम फेरी – ऑनलाईन सहभागाचे नियम
स्पर्धकांनी खालीलप्रमाणे सहभाग नोंदवायचा आहे:
विषय: विकसित महाराष्ट्र
या मुख्य विषयाच्या अंतर्गत, स्पर्धक खालीलपैकी कोणताही एक उपविषय निवडून सखोल मांडणी करू शकतात:
नवभारतासाठी नवमहाराष्ट्र: युवकांचे नेतृत्व, सामाजिक सक्रियता, आणि आधुनिक
महाराष्ट्र
घडवण्यातील त्यांचे योगदान.
माझं कर्तव्य, माझं योगदान – विकसित महाराष्ट्रासाठी: तंत्रज्ञान, डीजिटल
शिक्षण,
स्टार्टअप्स, व शाश्वत विकास यांचा ग्रामीण बदलामध्ये उपयोग.
शाश्वत, सुरक्षित आणि सर्वसमावेशक महाराष्ट्र: पर्यावरण, स्त्री सुरक्षा,
रोजगार,
आरोग्य, आणि सामाजिक समावेशकता या मुद्द्यांवर आधारित महाराष्ट्राचे स्वप्न.
टीप: स्पर्धकांना या उपविषयांचा वापर दृष्टीकोन समजावण्यासाठी मार्गदर्शक म्हणून करता
येईल.
अंतिम भाषणाचा आशय “विकसित महाराष्ट्र ” या शीर्षकाभोवती केंद्रित असावा.